राज्याचे पुन्हा वाटोळं करण्यासाठी भाजपला सत्ता द्यायची का? – शरद पवार

0
559

अहमदनगर, दि. १५ (पीसीबी) – भाजपच्या माध्यमातून समाजविरोधी प्रवृत्तींची वाढ होत आहे. त्या प्रवृत्तींचा पराभव करण्याचे काम करायचे आहे. राज्याचे पुन्हा वाटोळं करण्यासाठी यांना सत्ता द्यायची का? असा सवाल  करून असले सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नये, यासाठी जागृत राहून काम करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

अहमदनगरमधील राहुरी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता यांना पाठिंबा देईल, याची खात्री त्यांना नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक धोरणे जाहीर केली.  परंतु प्रत्यक्षात काय केले? असा सवाल त्यांनी केला. खोटे आरोप करणे, मोका लावण्याची कारवाई, यासाठी आमदारकीची सीट निवडून देता का? यासाठी सत्ता तुमच्या हातात दिली का? याचे भान ज्यांना रहात नाही, अशी मंडळी मत मागण्यासाठी तुमच्यापर्यंत येतात. त्यांना धडा शिकवण्याचे काम तुम्ही करा, असे आवाहन  पवार यांनी केले.

पंतप्रधान नऊ वेळा महाराष्ट्रात का येतात, गृहमंत्री राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरुन २० सभा का घेतात?  असा सवाल पवारां यावेळी केला.  त्यांना आता कळंलय की, या जनतेच्या मनात भाजप बद्दल, सरकारबद्दल नाराजी आहे. हे सरकार बदलले पाहिजे, अशाप्रकारची भावना आहे, त्यासाठीच पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री, इतर राज्याचे मुख्यमंत्री सभा घेत आहेत, असेही शरद पवार म्हणाले.