राज्याचे नेतृत्त्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करेल- संजय राऊत

0
392

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. जो निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य असेल तो निर्णय उद्धव ठाकरे घेतील. राज्याचे नेतृत्त्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करेल. उद्धव ठाकरे जी भूमिका मांडत आहेत ती हीच आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे आज आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांच्या या भूमिकेला सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला. युती तोडण्याचे पाप उद्धव ठाकरे करणार नाहीत असेही संजय राऊत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मतदार वाट बघत आहेत की शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी होईल? असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. आमच्याकडे भाजपाला वगळून पर्याय तयार आहे आणि संख्याबळही तयार आहे असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. भाजपाकाडे संख्याबळ नसल्यामुळेच ते सत्तास्थापनेचा दावा करत नाहीत असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्यापेक्षा जास्त मला काहीही नको असेही उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपाने आता सत्तेची हाव सोडून द्यावी असेही संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.