Maharashtra

राज्याची काय पूर्ण देशाची निवडणूक परत घ्या; पवारांचं भाजपाला आव्हान

By PCB Author

February 18, 2020

मुंबई,दि.१८(पीसीबी) – फक्त महाराष्ट्र या एका राज्याचीच विधानसभा निवडणूक पुन्हा कशाला घेता? संपूर्ण देशाचीच लोकसभा निवडणूक घ्या, असं आव्हान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फडणवीसांना केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जर हिंमत असेल तर पुन्हा विधानसभा निवडणुक त्यांनी लढवून दाखवावी, असं शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या अधिवेशनातून महाविकास आघाडीला ललकारलं होतं. यावर राज्याची काय पूर्ण देशाची निवडणूक परत घ्या, असं म्हणत पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं

हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा, असं खुलं आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिलं होतं. यावर सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या, असं फडणवीस म्हणाले होते.