Banner News

राज्याचा दहावीचा निकाल ९२ टक्के, कोकण विभाग अव्वल

By PCB Author

July 29, 2020

पुणे, दि. २९ (पीसीबी) : दहावी एसएससी बोर्डाच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून यंदाही कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 98.77 टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92 टक्के इतका लागला. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाचा निकाल 97.34 टक्के लागला, तर मुंबई विभागातून 96.72 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येईल.

विभागनिहाय टक्केवारी कोकण – 98.77 टक्के पुणे – 97.34 टक्के कोल्हापूर – 97.64 टक्के मुंबई – 96.72 टक्के अमरावती – 95.14 टक्के नागपूर – 93.84 टक्के नाशिक – 93.73 टक्के लातूर – 93.09 टक्के औरंगाबाद – 92 टक्के ‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार • www.mahresult.nic.in • www.sscresult.mkcl.org • www.maharashtraeducation.com www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती देखील उपलब्ध असणार आहे.

निकाल कसा पाहाल ? 💠निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा. 💠त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल. 💠त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल. 💠त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल. 💠यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल 💠निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

एसएमएसवर निकाल बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC <space> <seat no> असा एसएमएस टाईप करुन 57766 वर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएस सेवेद्वारे पाठवला जाईल. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध होईल.

निकालाची वैशिष्ट्ये परीक्षेला बसलेले विद्यार्थी – 15,84,264 उत्तीर्ण विद्यार्थी – 15,01,105 निकालाची टक्केवारी – 95.30 उत्तीर्ण मुलींची टक्केवारी – 96.91 उत्तीर्ण मुलांची टक्केवारी – 93.90 दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – 92.73 टक्के उत्तीर्ण पुनर्परीक्षार्थी निकाल – 75.86 टक्के उत्तीर्ण 60 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल 100 टक्के प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी – 5,50,809 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी -3,30,588 उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी – 80,335 8 हजार 360 शाळांचा निकाल 100 टक्के – गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 18.20 टक्के जास्त निकाल – कोरोनासह अनेक अडचणी मात करुन निकाल जाहीर – कोरोनामुळे भूगोलाचा पेपर रद्द, इतर विषयांच्या सरासरीनुसार भूगोल विषयाचे गुण – राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी – गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्या 65 हजार 85 ने वाढली आहे – संपूर्ण राज्यात परीक्षेसाठी 4 हजार 979 परीक्षा केंद्रे होती – एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी – राज्यात 3 ते 23 मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा – पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. – यामध्ये 9 लाख 75 हजार 894 मुले व 7 लाख 89 हजार 894 मुली आहेत. – राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली. – एकूण 9 हजार 45 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते.