Desh

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

By PCB Author

August 01, 2020

सिंगापूर, दि. १ (पीसीबी) – माजी सपा नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. उत्तर प्रदेशातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. जुलै २०१६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. तेव्हापासून ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. याच वर्षी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशनही करण्यात आले होते. प्रदीर्घ आजारामुळे त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

बिग बी अमिताभ बच्चन यांचे आणि त्यांचेही चांगले संबंध होते. मात्र या दोघांमध्ये काही मतभेदही झाले होते. ज्यानंतर यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांची माफीही मागितली होती.