राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे हरिवंश सिंह विजयी  

0
877

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी आज (गुरूवार) घेण्यात आलेल्या   निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह यांनी विजयी मिळवला. आवाजी मतदानातून निर्णय न झाल्याने मतदान घेण्यात आले. यात एनडीएच्या हरिवंश नारायण सिंह यांना १२५ मते मिळाली. तर यूपीएचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली. त्यानंतर राज्यसभेच्या उपसभापतिपदी हरिवंश सिंह हे विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.

राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून हरिवंश नारायण सिंह यांना, तर संयुक्त पुरोगामी आघाडीकडून बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी दिली होती. उपसभापतीपदासाठी आज राज्यसभेत निवडणूक घेण्यात आली. त्यात हरिवंश हे विजयी झाले.

दरम्यान, हरिवंश हे एनडीएचे उमेदवार होते. पण आता उपसभापतिपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ते आता कोणत्याही एका पक्षाचे नाहीत. त्यांनी चांगले काम करावे. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठिशी आहेत, अशा शब्दांत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हरिवंश सिंह यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.