Notifications

राज्यभरात गणेश विसर्जनावेळी २४ गणेशभक्तांचा बुडून मृत्यू

By PCB Author

September 24, 2018

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – राज्यभर गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असतानाच राज्याच्या काही भागात झालेल्या दुर्घटनांमुळे भक्तांच्या उत्साहावर रविवारी (दि. २३) विरजन पडले. रविवारी गणेश विसर्जनावेळी राज्यात झालेल्या विविध घटनांमध्ये २४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यात जुन्नर आणि जालन्यातील प्रत्येकी तीन तरुणांचा, तर अमरावती, यवतमाळ आणि भंडाऱ्यात प्रत्येकी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे.