राजीव गांधींविषयी विधान; मोदींना निवडणूक आयोगाकडून पुन्हा क्लिन चीट

0
422

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) –  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी  ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ असे  विधान केल्याप्रकरणी पंतप्रधान मोदी यांना निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिली  आहे. भारताच्या निवडणूक आयोगाच्या  निर्देशानुसार प्रथमदर्शनी आचारसंहितेचे उल्लंघन  झाल्याचे स्पष्ट होत नाही. त्यामुळे हे प्रकरण निकाली काढत आहोत, असे आयोगाने सांगितले.

याआधी पंतप्रधान मोदींना सोमवारी  ( दि. ६) आणखी दोन प्रकरणात निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट देण्यात आली होती. मोदींना आतापर्यंत नऊ प्रकरणांमध्ये क्लीन चिट मिळाली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधील सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, तुमच्या वडिलांचे दरबारी त्यांना मिस्टर क्लीन म्हणायचे, पण त्यांचे आयुष्य भ्रष्टाचारी नंबर वन म्हणून संपले.

या विधानावर मोदी विरोधात  काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार  दाखल केली होती.  मोदींविरोधात तातडीने कारवाई करून प्रचारसभांमधील त्यांच्या भाषणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.  त्यांचे  विधान आचारसंहितेच्या उल्लंघनासह ‘शहीदाचा अपमान केल्या सारखे आहे, असे काँग्रेसने म्हटले होते.