राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका करणार; डीएमकेचे जाहीरनाम्यात आश्वासन

0
484

चेन्नई,  दि. १९ (पीसीबी) – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचे आश्वासन तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेने आज ( मंगळवारी) प्रसिध्द केलेल्या  जाहीरनाम्यात दिले आहे. तसेच मोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे ‘पीडित’ झालेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देणार असल्याचेही  आश्वासन देण्यात आलेले आहे.    

लोकसभा निवडणुकीसाठी डीएमकेने आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. यात राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचे आश्वासन दिले आहे. याआधीही डीएमकेने राज्य सरकार आणि राज्यपालांकडे या प्रकरणातील दोषींच्या सुटकेची अनेकदा मागणी केली आहे. त्यावेळी राज्यात मोठे वादंग माजले होते.

दरम्यान, २१ मे १९९१ रोजी श्रीपेरंबदूर येथे राजीव गांधी यांची हत्या झाली होती. या प्रकरणी दोषी पेरारिवेलन, मुरुगन, नलिनी, शांतन, रविचंद्रन, जयकुमार आणि रॉबर्ट प्यास हे जवळपास तीन दशकांपासून तुरुंगात आहेत. सप्टेंबर २०१८मध्ये तामिळनाडू सरकारने एक प्रस्ताव मंजूर करून राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार, या प्रकरणात तुरुंगात कैद असलेल्या दोषींची सुटका करण्याची परवानगी मागितली होती.