राजस्थान, तेलंगणमध्ये मतदान सुरू

0
715

हैदराबाद, दि. ७ (पीसीबी) – राजस्थान आणि तेलंगण विधानसभा निवडणुकांसाठी आज, शुक्रवारी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली. तेलंगणमध्ये सकाळी ७ वाजता, तर राजस्थानमध्ये सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी जयपूरच्या वैशाली नगरातील केंद्रावर मतदान केलं. तर तेलंगणचे उपमुख्यमंत्री काडियम श्रीहरी यांनी वारंगल मतदारसंघातील केंद्रावर मतदान केले.

राजस्थानात २०० जागांसाठी तर, तेलंगणमध्ये ११९ जागांसाठी मतदान होत आहे. तेलंगणमध्ये ३२ हजार ८१५ केंद्रांवर मतदान होत आहे. अंदाजे तीन कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक आयोगाचे दीड लाख अधिकारी आणि कर्मचारी तेलंगणमध्ये सक्रिय आहेत. राजस्थानमध्ये ५१,६८७ मतदान केंद्रांवर निवडणूक होणार असून, १३० जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत रंगणार आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीत पणाला लागले असून, भाजप राजस्थानात कशी कामगिरी करतो हे पाहणे ‌उत्सुकतेचे असेल. विधानसभा निवडणुकांचे निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत.