Desh

राजस्थानात ७७ जागांवर काँग्रेस आघाडीवर

By PCB Author

December 11, 2018

जयपूर, दि. ११ (पीसीबी) – राजस्थान विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे.  ७७ जागा मिळवून काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजप ५५ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला बहुमतासाठी अवघ्या २४ जागा आवश्यक आहेत. त्यामुळे काँग्रेस बहुमताचा जादूई आकडा गाठणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

राजस्थानमध्ये एकूण १९९ जागा आहेत. सुरुवातीच्या कलांमध्येच काँग्रेसने ७७ जागा  मोठी आघाडी घेऊन बहुमताकडे आगेकूच सुरू ठेवली आहे.  भाजप केवळ ५५ जागांवर आघाडीवर  आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, काँग्रेस आघाडीवर असल्याने  काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष सुरू केला आहे. तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.  काँग्रेस नेते सचिन पायलट आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे आघाडीवर आहेत.