राजस्थानात राहुल गांधी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेणार – सचिन पायलट

0
756

जयपूर, दि. ११ (पीसीबी) – राजस्थानमध्ये काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. २०१३ मध्ये केवळ २१ जागा होत्या. यावेळी जनतेने भाजपला धडा शिकवला आहे. भाजप सरकारविरोधात लोकांनी राग व्यकत् केला आहे. काँग्रेसकडून लोकांना अपेक्षा असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील, असे राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी म्हटले आहे.  

सचिन पायलट म्हणाले की, राजस्थानमधील काँग्रेसचा विजय ही राहुल गांधींना भेट आहे. कारण गेल्या वर्षी याच दिवशी त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली होती. वसुंधरा राजें सरकारविरोधातील जनतेचा रोष  मतदानातून बाहेर पडला आहे.

इतर पक्षातील काही जण आमच्या संपर्कात आहेत, आम्ही काही लोकांच्या संपर्कात आहेत. आमचे सरकार बहुमताने सत्तेवर येईल. त्याचबरोबर राजस्थानसह तीन राज्यात आमचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.