राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची अशोक गेहलोतांनी घेतली शपथ  

0
505

जयपूर, दि. १७ (पीसीबी) – जयपूरच्या ऐतिहासिक अल्बर्ट हॉलमध्ये  अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा आज (सोमवार) पार पडला. यावेळी अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल कल्याण सिंह यांनी या दोघांनाही पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

गेहलोत हे तिसऱ्यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. राजस्थानचे ते २२वे मुख्यमंत्री आहेत.  या  शपथविधी सोहळ्याला  माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, जतीन प्रसाद, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी उपस्थिती लावली.

तर राजदचे नेते तेजस्वी यादव, शरद यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, जीतनराम मांझी आणि डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टालिन  यांनी उपस्थिती लावली.