राजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास आनंदच – उर्मिला मातोडकर

0
536

मुंबई, दि. १४ (पीसीबी) –  राजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल. मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांची सभा नकोय, असे कुणाला वाटेल ? असे म्हणत काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार उर्मिला मातोडकर यांनी राज ठाकरेंच्या  सभेसाठी निमंत्रण दिले आहे.

मुंबईत पत्रकारांशी मातोडकर बोलत होत्या.

राज ठाकरे यांनी मनसे लोकसभा निवडणूक  लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. तरी राज ठाकरे राज्यातील प्रमुख मतदार संघांमध्ये जावून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. ठाकरे     या लोकसभा निवडणुकीत  भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करत आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभांचा  फायदा सहाजिकच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार आहे. याच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न अनेक उमेदवार घेत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार आपल्या मतदारसंघात ठाकरे यांची सभा होण्यासाठी प्रयत्न करताना  दिसत आहेत.