‘राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील पार्किंगची कामे वेळेत पूर्ण करा’: आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश

0
617

भोसरी, दि.११ (पीसीबी) : भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली सुरु असलेली पार्किंगची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिले. तसेच परिसरातील हॉकर्सच्या पुनर्वसनाबाबतदेखील नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त पाटील यांनी यावेळी दिल्या.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशेजारी फुड प्लाझा तयार करण्यात येत आहे. या कामाची पाहणी तसेच भोसरी बस टर्मिनल जवळील पार्कींगच्या कामाची पाहणी आयुक्त पाटील यांनी आज केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, राजेंद्र राणे, देवन्ना गट्टूवार, रामनाथ टकले, वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र चौधर, महापालिकेच्या विविध विभागांचे उप अभियंता, मुख्य आरोग्य निरीक्षक आदी उपस्थित होते.

भोसरी बस टर्मिनल जवळ बससाठी पार्कींगची व्यवस्था करण्यात येत आहे. या पार्कींगच्या कामाची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी घेतली. वाहतुक कोंडीचे प्रश्न उद्भवू नये यासाठी उड्डाणपुलाखालील पार्कींगची कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्राधान्याने या कामाकडे लक्ष देऊन ते विनाविलंब पूर्ण करावे असे आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांना सांगितले. पथारीवाल्यांचे पुनर्वसन करताना सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन कार्यवाही करावी. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. सुलभ वाहतुक नियमन करण्यासाठी भोसरी आळंदी रोडवरील पार्कींगबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचनादेखील आयुक्त पाटील यांनी यावेळी दिल्या.