राजकीय पोस्टर पडून तरूणीचा मृत्यू, माजी आमदार म्हणतो वाऱ्यावर गुन्हा दाखल करा

0
824

तामिळनाडू, दि.७ (पीसीबी) – अनधिकृतपणे उभारलेले राजकीय पक्षाचे पोस्टर पडून एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडू मध्ये घडली आहे.

सुभश्री (वय २४, सॅफ्टवेअर इंजिनीअर) असे या मृत्यू झालेल्या तरूणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभश्री १२ सप्टेंबरला हेल्मेट घालून दुचाकीवरुन जात होती. यावेळी दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललीता आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांचे फोटो असलेले पोस्टर तिच्या अंगावर पडले होते. अपघातासाठी वाऱ्यावर गुन्हा दाखल करा अशी अजब मागणी तामिळनाडूतील अण्णाद्रमुकचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार सी पोन्नईया यांनी केली आहे. या अपघातासाठी पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीला जबाबदार धरता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. सुभश्रीच्या मृत्यूनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहिले होते. या प्रकरणी दोषी असलेल्या अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे.