राजकीय पक्षांकडून डिजीटल माध्यमांवर ५३ कोटींच्या जाहिराती; फेसबुकचा अहवाल

0
299

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – देशातील राजकीय पक्षांनी फेब्रुवारी २०१९पासून आजपर्यंत फेसबुक, गुगल आदी डिजिटल माध्यमांतून प्रचारासाठी ५३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक खर्च भाजपने केला आहे. ‘फेसबुक’ने जाहिरातींच्या संदर्भात नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून १५ मे पर्यंत १.२१ लाख राजकीय जाहिरातींचे प्रसारण केल्याचे आढळून आले आहे. ‘फेसबुक’वरील जाहिरातींवर विविध राजकीय पक्षांनी २६.५ कोटी रुपये खर्च केले आहेत. या शिवाय गुगल, यूट्युब आणि अन्य ऑनलाइन कंपन्यांवर राजकीय पक्षांनी १९ फेब्रुवारीपासून आतापर्यंत १४,८३७ जाहिराती करून त्यापोटी २७.३६ कोटी रुपये खर्च केले आहेत.