राजकारण करण्याबाबत अजितदादाच्या पुत्राची वेगळी भूमिका  

0
741

बारामती, दि. ७ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे दुसरे पूत्र जय पवार यांनी राजकारणाबाबत मोठी भूमिका घेतली आहे. अजित पवारांनी मुलांना राजकारणात न येता शेती उद्योग करण्याचा सल्ला नुकताच  दिला आहे. हाच धागा पकडत जय पवार यांनी मी राजकारण आलो तरी कोणतीही निवडणूक लढविणार नाही,  असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

बारामतीतून अजित पवार निवडणूक लढवत  आहेत.  त्यांच्या प्रचारासाठी जय पवार सक्रीय झाले आहेत.  पार्थ पवार यांनी  मावळ मधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी  जय पवार यांनी सोशल मीडियातून प्रचाराची धुरा सांभाळली होती.  आता त्यांनी अजित पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीत पदयात्रा काढली आहे.

यावेळी  जय पवार म्हणाले की, अनेकदा माझ्या राजकारणाच्या प्रवेशाची चर्चा सुरु असते. जरी मी राजकारणात उतरलो तरी पक्षाचे कोणते तरी पद घेऊन सामान्य माणसांसाठी काम करेन. पण मी कोणतीही निवडणूक लढविणार नाही. त्याचबरोबर पवार कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, असाही आरोप जय पवार यांने यावेळी केला.