रहाटणी येथे पादचारी तरुणीची पर्स हिसकावून चोरटे पसार

0
558

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – रस्त्याने पायी चाललेल्या एका तरुणीची पर्स जबरदस्तीने हिसका मारुन दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना मंगळवारी (दि.४) रात्री दहाच्या सुमारास रहाटणी कोकणे चौकातील चितळे बंधु स्विटजवळ घडली.

याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी २६ वर्षीय तरुणी रहाटणी कोकणे चौकातील चितळे बंधु स्विटजवळील रस्त्यावरुन जात होती. यावेळी मागून एका दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी तरुणीच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेली. त्या पर्समध्ये मोबाईल आणि काही रोख रक्कम असा एकूण ७ हजार ४०० रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.