रहाटणी, पिंपळेसौदागर येथे गांधी जयंतीनिमित्त मंगळवारी रेड डॉट मोहीमचे आयोजन

0
916

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – नाना काटे सोशल फाउंडेशन, नगरसेविका शितल काटे व रोझलॅड रेसिडेन्सी यांच्या संयुक्त विद्यामाने महात्मा  गांधी जयंतीनिमत्त रेड डॉट मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. रेड डॉट या मोहीमे अंतर्गत स्वच्छता विषयक कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.

रेड डॉट या मोहिमेपासून मळलेल्या सॅनेटरी  नॅपकिन आणि डायपर, स्वयपाक घरातील कचऱ्यात मिसळण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी फायदा होणार आहे. सॅनेटरी  नॅपकिन विघटन करण्यासाठी ५०० ते ६०० वर्षे लागतात. वापरलेला डायपर त्यापेक्षा  अधिक कालावधी लागतो. डायपर आणि सॅनेटरी  नॅपकिनचे उत्पादन टाकाऊ पदार्थाचे पाकीट प्रदान करणे आणि कचरा व्यवस्थापन नियम २०१६ प्रमाणे स्वच्छता विषयक टाकाऊ पदार्थाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.त्यामुळे, कम्पोस्ट खत निर्मिती करता येईल. स्वच्छता विषयी काम करणाऱ्या कामगारांना कचरा वर्गीकरण करण्यास  रेड डॉट मुळे मदत होणार असल्याचे नगरसेवक नाना काटे यांनी सांगितले.

या मोहिमेमध्ये रहाटणी, पिंपळेसौदागर परिसरातील नागरिकांनी सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेविका शितल काटे यांनी केले.