रहाटणीत बदनामीची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार

0
2688

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधाची माहिती विवाहितेच्या पतीला देण्याची धमकी देऊन एका विवाहित तरुणाने तिच्यावर बालत्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रहाटणी येथे घडली.

याप्रकरणी २४ वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, ओकार रघुनाथ कांबळे (वय २४, रा. बळीराज कॉलणी नं.२, रहाटणी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीपासून विभक्त झालेला ओकार याचे पीडित २४ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र तिचे दुसऱ्या मुलासोबत लग्न झाले. आणि तरुणी त्याला टाळून लागली. यामुळे ओकार तिला त्रास देऊ लागला. त्यानंतर ओकारने तरुणीला त्याच्या घरी बोलवले तेथे त्यानी तिला लग्नापूर्वीचे त्याच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती तुझ्या पतिला सांगेन, अशी धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात ओकार विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओकारला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत.