Chinchwad

रहाटणीत घरात घुसून बळजबरीचा प्रयत्न; महिलेची बचावासाठी घराच्या गॅलरीतून उडी

By PCB Author

April 14, 2018

मध्यरात्री घरात घुसून जबरदस्ती करणाऱ्या आरोपीच्या तावडीतून  सुटका करुन घेण्यासाठी एका  महिलेने घराच्या गॅलरीमधून खाली उडी मारली. ही धक्कादायक घटना गुरूवारी (दि.५) मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास रहाटणीतील महाराष्ट्रनगर येथे घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत अज्ञात आरोपी तिच्या घरात शिरला व तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्यास विरोध केला.  त्यानंतर या   महिलेने खाली उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवर उडी मारली. त्यात ती  गंभीर जखमी झाली आहे.  तिला रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये महिलेचा उजवा पाय फॅक्चर झाला आहे.

वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.