रहाटणीत कोयते तलवारींनी टोळक्यांकडून कुटुंबाला मारहाण; कारची केली तोडफोड

0
464

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – आठ ते दहाच्या जणांच्या टोळक्यांनी घरात घुसून एकाच कुटुंबातील लोकांना कोयता, तलवारी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड करुन कारचेही नुकसान केले. ही घटना आज (गुरुवार) सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रसन्न कॉलनी, रहाटणी येथे घडली.