रहाटणीतील नवीन घरात रहायला गेलेल्या नवविवाहित तरुणीची आत्महत्या

0
711

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – नुकत्याच घेतलेल्या नवीन घरात दोन दिवसांपूर्वी रहायला गेलेल्या नवविवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १२) दुपारी साडेतीनच्या सुमारास रहाटणीतील श्रीनगर येथे असलेल्या समता कॉलनी येथे घडली.

सारिका गणेश पाटील (वय २०, रा. समता कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवविवाहित तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिकाचे गणेश सोबत काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. यादरम्यान गणेशने घेतलेल्या रहाटणी येथील समता कॉलनीतील नवीन घरात दोन दिवसांपूर्वीच सारिका, पती गणेश आणि सासू रहायला गेले होते. शुक्रवारी अचानक सारिकाने घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे अद्याप कारण समजू शकलेले नाही. वाकड पोलिस तपास करत आहेत.