Maharashtra

रश्मी ठाकरे यांचे वडिल माधव पाटणकर यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन

By PCB Author

June 15, 2020

महाराष्ट्र, दि.१५ (पीसीबी) – माधव गोविंद पाटणकर यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. माधव गोविंद पाटणकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सासरे व रेश्मी ठाकरे यांचे ते वडिल होते.

मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हाँस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत अशी भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले.त्यांच्या निधनामुळे पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली. @OfficeofUT

— Supriya Sule (@supriya_sule) June 15, 2020