Videsh

रशियात कोरोना लसीकरण ऑक्टोंबर पासून

By PCB Author

August 09, 2020

मॉस्को, दि. ९ (पीसीबी) : सध्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. अशातच जगभरातील अनेक वैज्ञानिक कोरोना व्हायरसवर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच एक आनंदाची बातमी आहे. जगाला कोरोनाची पहिली लस मिळण्याची शक्यता आहे. रशियाचे रशियाचे उप आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी सांगितले की, रशिया 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं आहे. खास गोष्ट म्हणजे, वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याील क्लिनिकल ट्रायल अद्याप सुरु आहे.

रशिया सरकारच्या वतीने दावा करण्यात आला आहे की, Gam-Covid-Vac Lyo नावाचं हे वॅक्सिन 12 ऑगस्ट रोजी रजिस्टर करण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये याचं मास-प्रोडक्शन सुरु करण्यात येणार आहे. तसेच ऑक्टोबर पासून देशभरात लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

सर्वात आधी वॅक्सिन रजिस्टर करण्यासाठी रशियाची धडपड जगभरातील वैज्ञानिकांना चिंता आहे की, वॅक्सिन तयार करण्याच्या घाी गडबडीत आपल्याकडून कोणतीही चूक होता कामा नये. तसेच घाईघाईत या वॅक्सिनच्या उलट्या परिणामांचा सामना करावा लागू नये. परंतु, रशिया सर्वांच्या आधी वॅक्सिन लॉन्च करण्यासाठी धडपड करत आहे. तसेच रशियाकडून वॅक्सिन कोरोनावर प्रभावी असल्याचे दावे वारंवार करण्यात येत आहेत. परंतु, यांच्या दाव्याला दुजोरा देणारं कोणत्याही वैज्ञानिकाची साक्ष प्रकाशित करण्यात आलेली नाही.