रत्नाकर गुट्टे महाराष्ट्राचे छोटे नीरव मोदी – धनंजय मुंडे

0
370

नागपूर, दि. १७ (पीसीबी) – राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावे ५ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज काढल्याचा आरोप करून ते महाराष्ट्राचे छोटे नीरव मोदी आहेत, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (मंगळवार) म्हटले.

गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे यांनी कोट्यवधी रुपये बुडवले आहेत. गुट्टेंनी शेतकऱ्यांची फसवणूक करुन शेकडो शेल कंपन्यांची स्थापना केली. २३ बनावट कंपन्या तयार करुन शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतले. हे प्रकरण दाबण्यासाठी शेतकऱ्यांना धमकावून दमदाटीही केली, असा आरोप मुंडे यांनी केला.

रत्नाकर गुट्टेने ९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावे हे कर्ज घेतले आहे. एका शेतकऱ्याच्या नावे ४० ते ५० लाख कर्ज घेतले. त्याचबरोबर न्यायमूर्तींच्या मयत भावाच्या नावानेही बनावट कर्ज घेतले आहे. देशातील एकाही बँकेला त्यांनी सोडलेले नाही, असा आरोप मुंडे यांनी यावेळी केला.