Maharashtra

रडणाऱ्यातले आम्ही नाही, आम्ही लढणाऱ्यांपैकी आहोत – सुधीर मुनगंटीवार

By PCB Author

February 20, 2020

मुंबई,दि.२०(पीसीबी) – कर नाही त्याला डर कशाला. रडणाऱ्यातले आम्ही नाही, आम्ही लढणाऱ्यांपैकी आहोत, भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकार हे गेल्या भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे अहवाल विधीमंडळ अधिवेशनात मांडणार असल्याबाबत मुनगंटीवारांना विचारलं. त्यावर मुनगंटीवार म्हणाले, “स्वागत आहे. गेल्या युती सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांवर आरोप झाले होते. सगळ्यांचेच अहवाल मांडले जावेत. कर नाही त्याला डर कशाला. रडणाऱ्यातले आम्ही नाही, आम्ही लढणाऱ्यांपैकी आहोत. त्यांची ईडी चौकशी लागली की रडतात”.

दरम्यान, “आयुष्यभर शरद पवारांनी मतांचे तुष्टीकरण केलं. खुर्चीसाठी पार्टी फोडली. तुम्ही तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ट्रस्ट स्थापन होतोय. मग आरोपांचे कारण काय?” असा सवाल करत सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या राम मंदिर ट्रस्टवरुन वर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.