Desh

रजनीकांत भाजपचे पोपट आहेत – पी. चिदंबरम

By PCB Author

February 06, 2020

कर्नाटक, दि.६ (पीसीबी) – काही दिवसांपूर्वीच सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी सीएएच्या मुद्द्यावरुन होणाऱा विरोध पाहता यावर दु:ख व्यक्त केले होते. ट्विट करत त्यांनी या सर्व प्रकरणी निराशा व्यक्त केली होती. हिंसेच्या मार्गाने कोणत्याही समस्येवर तोडगा निघत नाही. मी भारतीयांना कायम एकत्र राहण्याचाच संदेश देत आलो आहे. कायम देशाची सुरक्षितता आणि देशहिताचा विचार करा. असे त्यांनी ट्विट करत म्हटले होते.

रजनीकांत भाजपचे पोपट आहेत असल्याची बोचरी टीका काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे.रजनीकांत हे आपल्या मालकानं दिलेली पटकथा ते वाचत असल्याचंही टीका चिदंबरम यांनी केली आहे. याबाबत चिदंबरम यांनी ट्विट केले आहे.दरम्यान, चिदंबरम यांच्या टीकेवर रजनीकांत काय बोलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

I think we could create an opportunity when the discriminatory provisions of CAA can be explained to Mr.Rajnikanth.

— P. Chidambaram (@PChidambaram_IN) February 5, 2020