रक्षाबंधनाला पंकजा आणि प्रितमताई या दोघींचीही आठवण येते -धनंजय मुंडे

0
436

बीड, दि. १६ (पीसीबी)  रक्षाबंधन खरंतर भाऊ बहिणीला एका बंधनात बांधणारा दिवस मात्र या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या भाऊ-बहीण जोडीची चर्चा होते. ही जोडी म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावंडांची. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘आजच्या दिवशी मला राजकारणातील माझ्या बहिणीची आठवण आल्याशिवाय निश्चितच राहत नाही’, या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना राखी बांधण्यासाठी आज त्यांच्या तिघी बहिणी त्यांच्या परळी येथील निवास्थानी आल्या होत्या. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना धनंजय मुंडे यांनी ‘आम्ही वेगळे होण्याअगोदर माझ्या आयुष्यात रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी मला पंकजाताईनी बांधली आहे आणि भाऊबीजेची पहिली ओवाळणी सुद्धा पंकजाताईनीच केली आहे’, अशी आठवण सांगितली. आमच्या नात्यात राजकारणामुळे दुरावा निर्माण झाला असली तरी नात्यात संवाद असावा अशीच माझी कायम भूमिका राहिली आहे, असेही ते म्हणाले. ‘आम्ही वेगळे होण्याअगोदर माझ्या आयुष्यातली पहिली राखी मला पंकजाताईनी बांधली आणि भाऊबीजेची पहिली ओवाळणी सुद्धा पंकजाताईनीच केली’, हे सांगत आजच्या दिवशी पंकजा आणि प्रीतम ताई या दोघींचीही आठवण येतेच असं धनंजय मुंडे म्हणाले.