Pimpri

रक्तदान शिबिर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारांचे वितरण

By PCB Author

May 20, 2022

पिंपरी,दि. २० (पीसीबी) – स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या एकोणचाळिसाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रविवार, दिनांक २२ मे २०२२ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, सिंधूनगर, निगडी प्राधिकरण येथे सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक रक्तदात्यांनी दीपक पंडित (भ्रमणध्वनी क्रमांक ९५६१०९६५४१), सुजीत गोरे (भ्रमणध्वनी क्रमांक ८६९८६९५२४६) अथवा अभ्यासिका प्रतिनिधी कल्याणी धनगर आणि सुजीत दराडे (भ्रमणध्वनी क्रमांक ८८५७८७१८४८) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रसेवा हे व्रत घेऊन उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना दरवर्षी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येते.

पुरस्काराचे हे चौदावे वर्ष असून या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारासाठी (रुपये एक लक्ष आणि सन्मानचिन्ह) ॲड. मदन मोहन पांडे (श्रीराम जन्मभूमी खटल्यातील प्रमुख वकील) आणि राज्यस्तरीय पुरस्कारासाठी (रुपये एकावन्न हजार आणि सन्मानचिन्ह) अकोला येथील ज्येष्ठ कारसेवक श्रीकांत कोंडोलीकर यांना नेवासा येथील श्री दत्त मंदिर संस्थानचे गुरुवर्य भास्कर गिरी महाराज यांच्या हस्ते शनिवार, दिनांक २८ मे २०२२ (स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती) रोजी सायंकाळी सहा वाजता मनोहर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी येथे सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या सोहळ्यासाठी सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर आणि सचिव प्रदीप पाटील यांनी केले आहे.