Maharashtra

योग सगळ्या जगाने स्वीकारला याचा मला अभिमान- देवेंद्र फडणवीस

By PCB Author

June 21, 2019

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह योगासने केली. नांदेडमध्येही योग दिवस साजरा झाला. सगळ्या जगाने योग स्वीकारला याचा मला अभिमान वाटतो आणि हे शक्य झाले ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच.

योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. ही परंपरा जगभरात पोहचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. आपल्या देशाची प्राचीन परंपरा सगळ्या जगाने स्वीकारली ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. भारतात योग पोहचवण्याचे काम रामदेवबाबांनीही केले असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे असे म्हणत त्यांनी योग दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी योगासनांच्या विविध कसरतीही सादर करण्यात आल्या. त्यानंतर बाबारामदेव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग पोहचवला याबाबत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. योग हा आपल्या आयुष्यात मोलाचा वाटा उचलणारा भाग आहे, आपल्याला योग निरोगी ठेवण्यास मदत करतो असेही प्रतिपादन बाबा रामदेव यांनी केले.