योग्यच केले….आम्ही सोबत आहोत. महिला म्हणून राजकारण करताना मीदेखील खुप जवळून अनुभवतेय…- रुपाली चाकणकर

0
742

 

पुणे, दि.८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात राहणाऱ्या एका सिव्हील इंजीनिअर तरुणाने गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर बोलावून तरुणाला मारहाण केल्याचा भाजपानं आधीच निषेध नोंदवला आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आव्हाडांच्या या कृतीचे समर्थन केले आहे. आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत. अस म्हणत रुपाली चाकणकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना पाठींबा दिला आहे.

योग्यच केले….आम्ही सोबत आहोत. खुप दिवस सहन केली, या सडक्या मेंदुच्या विचारांची घाण . महिला म्हणून राजकारण करताना मीदेखील खुप जवळून अनुभवतेय…मी एखादी प्रतिक्रिया दिली तर त्यावर वैचारिक मत मांडावे ते मला मान्य आहे. पण असं होताना दिसत नाही, एखादी महिला स्वतःच्या कर्तृत्वाने नेतृत्व स्विकारत असेल,विचार मांडत असेल, तिची कार्यप्रणाली समृद्ध होत असेल ,आणि तिच्यावर टिका करण्यासारखं हातात काहीच नसेल तर ,तर तिच्या चारिञ्यावर शिंतोडे उडविण्याचा जाहिर कार्यक्रम सोशल मिडीयाच्या माध्यमातून होतो. अस रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.