योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशात अंदाधुंदी प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ४० हजार

0
185

गोरखपूर, दि. २८ (पीसीबी) – कोरोनामुळे पूर्ण उत्तर प्रदेश होरपळत असून प्रशासना आता पूरते हातबल झाले आहे. हॉस्पिटल, स्मशाने सगळे हाऊसफूल्ल असून ऑक्सिजन अभावी रोज लोक मरत आहेत. कहर म्हणजे आता अंत्यसंस्कारासाठी स्मशानात तब्बल ४० हजार रुपये मोजावे लागतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनाचे तिनतेरा वाजले असून लोक संतापले आहेत.

गोरखपूर हा मुख्यमंत्री आदित्य नाथ यांचा पूर्वीचा लोकसभा मतदारसंघ. गोरखपूरमध्ये राजघाटावर प्रेत्यावर अंत्यसंस्कारासाठी १५ हजार रुपये मागितले तेव्हा नातेवाईकांनी गोंधळ केला. मंगळवारी रात्रीच्या या प्रकाराने भाजपा सरकराचा पोलखोल झाला आहे.

राजघाट येथे कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार केले जातात.गोरखपूर नगरपालिकेची यंत्रणा त्यासाठी काम करते. दौडपूरच्या कोविड इस्पितळात एका पोलिस आधिकाऱ्याच्या पत्नीचे निधन झाले. रुग्णवाहिकेतून मृतदेह राजघाट येथे आणला होता. येथे त्यांनी अंत्यसंस्काराबद्दल विचारणा केली असता १५ हजार रुपये मागितले. घाटावर नगरपालिका कर्मचारी चंदनने ४० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप अधिकाऱ्याने केला. नंतर मोठा गोंधळ झाला.

खजनी येथे राहणार्‍या महिलेच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन रात्री उशिरा ही महिला राजघाट येथे पोहोचली. स्मशानभूमीत तेथे जमलेल्या लोकांकडून अंत्यसंस्कार करण्याची विनंती त्यांनी केली. या महिलेकडे १५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. केवळ सातशे रुपये असल्याचे सांगितले तर महिलेने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. रात्री उशिरा पत्नीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या पत्नीने महिलेच्या पतीच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली.

नातेवाईकांचा असा आरोप आहे की जसजशी जसजशी रात्र वाढत जाते तसतसे दर वाढत जाते. रात्री १२ नंतर त्यांची मागणी ४० हजार रुपयांपर्यंत आहे. नातलग त्याच्यासमोर विनवणी करतात, पण ते बधत नाहीत.