येस बँकेवर घातलेल्या निर्बंधांचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला

0
369
नागपूर, दि.८ (पीसीबी) – येस बँकेत कर्जवाटपात घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. बँकेतील आर्थिक अनियमितता चव्हाट्यावर आल्यानंतर ईडीनं शुक्रवारी रात्री बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली.या संपूर्ण प्रकरणात ईडीनं बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक केले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी येस बँकेवर निर्बंध लादल्यानंतर सगळ्या व्यवहारावर बंधने आली आहेत. ग्राहकांना केवळ ५० हजार रुपये काढता येणार आहेत. आता आरबीआयने येस बँकेवर घातलेल्या निर्बंधांचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बसण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाचे कित्येत कोटी रुपये अडकले आहेत. विद्यापीठाच्या येस बँकेमध्ये १९१ कोटींच्या ठेवी असल्याची माहिती सामोर आली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचा पर्याय असताना खासगी बँकेत इतक्या ठेवी ठेवल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शुक्रवारी यासंदर्भात सिनेटची बैठक झाली. दरम्यान राष्ट्रीयीकृत बँकेत विद्यापीठाने पैसा का ठेवला नाही, असा सवाल अॅड. मनमोहन वाजपेयी यांनी उपस्थित केला आहे.