येरवड्यात जड फरशी अंगावर पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू

0
741

पुणे, दि. १६ (पीसीबी) – बांधकाम साईटवर फरशीची ने-आण करताना जड फरशी अंगावर पडल्याने दोन कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास येरवडा परिसरात घडली.

प्राप्त माहितीनुसार, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोट क्लब रस्त्यावर एका इमारतीचे काम सुरू आहे. याठिकाणी मोठ्या फरश्यांची ने-आण करत असताना यातील काही फरश्या कामगारांच्या अंगावर कोसळल्या. याखाली दोन कामगार दबले गेले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या दोन्ही कामगारांची ओळख अद्याप पटलेली नाही.