Pune

येरवड्यात एकाचा गोळीबार आणि तलवारीने वार करुन खून

By PCB Author

January 07, 2019

पुणे, दि. ७ (पीसीबी) – येरवडा येथील गोल्फ क्लब ते आंबेडकर चौक रस्त्यादरम्यान एका इसमावर गोळीबार केल्यानंतर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि.६) सायंकाळी घडली.

संदीप देवकर (वय ४५, रा. खडकी, पुणे) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पहिले देवकर यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्यानंतर तीक्ष्ण शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला करत खून केला. घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याप्रमाणे परिसरातील नागरिकांकडे चौकशी करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

दरम्यान येरवडा येथील नेताजी हायस्कूलसमोर हातगाडी लावण्यावरून मारेकरी आणि देवकर यांच्यात दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादातूनच चार जणांनी मिळून त्यांचा खून केल्याचे बोलले जात आहे. येरवडा पोलीस तपास करत आहेत.