Maharashtra

येडं पेरलं आणि खुळं उगवलं; धनंजय मुंडेंचा रावसाहेब दानवेंना टोला

By PCB Author

April 03, 2019

मुंबई, दि. ३ (पीसीबी)  – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यात बोलताना विंग कमांडर अभिनंदन यांचा ‘हेलिकॉप्टरचा पायलट’ असा उल्लेख केला होता.  यावर टोला लगावताना  विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येडं पेरलं आणि खुळं उगवलं असे म्हटले. 

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटे आहे की, ‘यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही, मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष’यावेळी धनंजय मुंडे यांनी बे एके बे…बे दुने चार…बे त्रिक बेअक्कल अशा शब्दांत  रावसाहेब दानवे यांच्यावर  टीका केली.

तुम्ही चॅनेलवर पाहिले असेल २४ तासाच्या आत पाकिस्तानी सैन्याने अभिनंदनला भारतात सोडले. अरे एक पोलीसवाला आमची मोटारसायकल पकडतो, ट्रिपल सीट धरले तर चार दिवस न्यायालयातून सोडून आणावी लागते. आणि आपल्या हेलिकॉप्टरचा पायलट २४ तासांत सोडून आणला, असा पंतप्रधान या देशाला पाहिजे, असे दानवे यांनी म्हटले होते.