Notifications

“येइयो अंबानी माझे माउली ये।। विडंनात्मक आरतीतून जितेंद्र आव्हाडांची राफेल करार, मोदीवर टीका

By PCB Author

October 14, 2018

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राफेल प्रकरण देशभरात गाजत असताना आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनोख्या पध्दतीने राफेल करार, अंबानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. आव्हाड यांनी खास विडंबनात्मक आरती तयार करुन, ती गायली आहे. तसेच फेसबुक, ट्विटरवरुन शेअर  केली असून ती चांगलीच व्हायरल झाली आहे.