Maharashtra

यूपीएससी परीक्षेत सारथीच्या २० विद्यार्थ्यांनी लावला झेंडा

By PCB Author

April 19, 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत सारथीच्या (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) २० विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. नुकतीच युपीएससीची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. सारथी संस्थेकडून विद्यावेतन घेऊन नवी दिल्ली आणि पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात अळी होती. तसेच संस्थेकडून मुलाखतीसाठी तज्ञांमार्फत मार्गदर्शन देण्यात आले होते. मुलाखतीसाठी असे मार्गदर्शन लाभलेल्या एकूण ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थी नागरी सेवा परीक्षेच्या अंतिम यादीत झळकले आहेत. या यादीत 4 विद्यार्थिनींचा देखील समावेश आहे. या २० विद्यार्थ्यांमध्ये पुणे जिल्ह्यातून ०६, नाशिक जिल्ह्यातून ०५, अहमदनगर जिल्ह्यातून ०२, तसेच कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी यशस्वी झाला आहे.

मागील तीन वर्षात सारथी संस्थेमार्फत मार्गदर्शन लाभलेले एकूण ५८ विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झाले होते. यावर्षी एकूण २० विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवल्याने सारथीमार्फत परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७८ इतकी झाली असल्याची माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (भा.प्र.से.) यांनी दिली आहे. तसेच सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सारथी संस्था, पुणे ही मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या गटांतील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. तसेच या गटांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळावे यासाठी संस्थेमार्फत त्यांना विद्यावेतन तसेच मार्गदर्शन मिळते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ च्या यादीतील सारथी संस्थेचे विद्यार्थी

रॅंक यशस्वी विद्यार्थ्याचे नाव जिल्हा१२२ विनय सुनील पाटील नाशिक१४७ आशिष अशोक पाटील कोल्हापूर२२४ ठाकरे ऋषिकेश विजय अकोला२५८ शामल कल्याणराव भगत पुणे२६७ उन्हाळे आशिष विद्याधर बुलडाणा२८७ निरंजन महेंद्रसिंह जाधवराव पुणे३०८ घोगरे हर्षल भगवान पुणे३५९ शुभम भगवान थिटे पुणे३९५ अंकित केशवराव जाधव हिंगोली४१४ खिलारी मंगेश पराजी अहमदनगर४९६ पाटील लोकेश मनोहर जळगाव५३१ मानसी नानाभाऊ साकोरे पुणे६०४ आविष्कार विजय डेर्ले नाशिक६१० केतन अशोक इंगोले वाशिम६२२ देशमुख राजश्री शांताराम अहमदनगर७०६ निकम सूरज प्रभाकर नाशिक७३२ कुणाल संजय अहिरराव नाशिक७५९ गौरी शंकर देवरे पुणे८३७ शुभम उत्तमराव बारकाळे नाशिक९७६ श्रवण अमरसिंह देशमुख सातारा