Pimpri

युवक काँग्रेसच्या पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी हिराचंद जाधव १७७ मतांनी विजयी

By PCB Author

September 20, 2018

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – नुकत्याच पार पडलेल्या पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसच्या निवडणूकीत हिराचंद जाधव यांचा १७७ मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.

सर्वसामान्य तरुणांना राजकारणात समाविष्ट करून घेण्यासाठी दर २ वर्षानी निवडणूका घेवून त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. हिराचंद जाधव हे गेल्या ४ वर्षापासून युवक काँग्रेसच्या पिंपरी विधानसभा सरचिटणीस पदी काम करत होते. आता नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत विजय मिळाल्याने २०१८ ते २०२० या कार्यकाळापर्यंत पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे.