युती न झाल्यास नारायण राणे भाजपमध्ये, छगन भुजबळ शिवसेनेत?

0
371

मुंबई, दि.१६ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार की नाही? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. युतीसंदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरु आहे. मात्र जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याचे अद्याप युती होऊ शकलेली नाही. युती न झाल्यास नारायण राणे आणि छगन भुजबळ यांचा पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत आले आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांनी आपले हुकुमी एक्के लपवून ठेवले आहेत. नारायण राणे आणि छगन भुजबळांचा प्रवेश का लांबणीवर पडलाय? याचं कारणही युतीच आहे.

जागा वाटपाटपाचा तिढा सुटत नसल्याचे दोन्ही पक्षांची स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरु केली आहे. दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी राणे आणि भुजबळांना राखून ठेवल्याचं समजत आहे.

नारायण राणेंना भाजपने घेतलं तर शिवसेनेला पटणार नाही. त्यामुळेच भाजपच्या काळात ज्या भुजबळांवर कारवाई झाली, त्यांना शिवसेनेत घेतलं तर भाजपला पटणार नाही, म्हणून दोन्ही पक्षांनी राणे-भुजबळ अस्त्र राखून ठेवलं आहे.