युतीबद्दलची भूमिका संध्याकाळी ४.३० नंतर जाहीर करणार : सुधीर मुनगंटीवार

0
415

#मुंबई : आज संध्याकाळी ४.३० नंतर युतीबद्दलची भूमिका स्पष्ट करु, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. भाजप सत्तास्थापनेसाठी असमर्थ असल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण पाठवलं आहे.

शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज संध्याकाळी ७.३०पर्यंतची वेळ आहे. त्यामुळे संध्याकाळी साडेसातपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करणार का? हे पाहूनच भाजप आपला निर्णय जाहीर करणार आहे.

राज्यात सत्ता समीकरणासाठी शिवसेना शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत. भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवली तरी शिवसेनेचा पर्याय संपुष्टात आला, हे मान्य करायला भाजप तयार नाही. शिवाय काँग्रेस पाठिंबा देईल, याबाबत अजूनही साशंकता आहे. त्यामुळे बॉल पुन्हा भाजपच्या कोर्टात जाऊ शकतो. जर शिवसेना सत्ता स्थापन करण्यास अयशस्वी ठरली तर भाजप काय करणार याकडे आता लक्ष लागलं आहे.