Maharashtra

‘या’ १३ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

By PCB Author

June 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळाचा  आज (रविवारी)  बहुप्रतिक्षित विस्तार करण्यात आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपच्या १०, शिवसेनेचे २ तर रिपाइंच्या अविनाश महातेकर यांना मंत्रीपदाची शपथ दिली.

भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, आशिष शेलार, अनिल बोंडे, संजय कुटे आणि अशोक उईके यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तर भाजपच्या परिणय फुके, अतुल सावे, बाळा भेगडे आणि योगेश सागर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तर शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात आज नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला.  मलबार हिल येथील राजभवन येथे नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.