‘या’ १२ खासदरांचे निलंबन, शिवसेनेच्या दोघांचा समावेश

0
337

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – तीन वादग्रस्त कृषी कायदे आणि इतर मुद्दयावरून लोकसभेचं पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजलं होतं. त्यावेळी विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातल्याचं पहायला मिळालं आहे. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गोंधळ घातला होता. अशातच आता हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षातील 12 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या फुलो देव निताम, छाया वर्मा, रिपून बोरा, राजमणी पटेल, सय्यद नसीर हुसैन, अखिलेश प्रसाद सिंग या सहा खासदारांचा समावेश आहे. तर डोला सेन आणि शांता छेत्री या दोन तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचा देखील समावेश आहे.

त्याचबरोबर शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई या दोन खासदारांचं देखील निलंबन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर सीपीएमचे खासदार एल्लामारम करीम आणि सीपीआयचे खासदार बिनोय विश्मव यांचा देखील निलंबित करण्यात आलं आहे.