‘या’ शहरात ऑक्सिजनची मागणी 100 पटीने वाढली

0
210

पुणे, दि. २२ (पीसीबी) : ऑक्सिजनची मागणी 100 पटीने वाढली आहे. दरररोज 16 टन मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन केले जात आहे. पूर्वी 6 टन उत्पादन केले जात होते. त्यामध्ये वाढ होऊन 16 टनावर गेले आहे. तरी, देखील हॉस्पिटलला देण्यासाठी ऑक्सिजन कमी पडत आहे. ऑक्सिजन तयार करण्यासाठी कच्चा मिळत नाही. कच्या मालाचा मोठा तुटवडा आहे.विशाखापट्टणम, बिल्लारीवरून मंगळवारी कच्चा माल आणला असल्याचे चाकण येथील ऑक्सिजन उत्पादक संदेश सेठीया यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात गंभीर, अति गंभीर रुग्णांचे प्रमाण जास्त असून या रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. ऑक्सिजनची मागणी वाढली असताना शहरातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. रात्री, अपरात्री साठा संपत आहे. नवीन रुग्ण दाखल करून घेण्यातही रुग्णालयांना अडचणी येत आहेत. कच्चा माल मिळत नसल्याने ऑक्सिजनची निर्मिती करण्यास अडचणी येत आहेत. चाकण येथील ऑक्सिजन उत्पादक संदेश सेठीया म्हणाले, “ऑक्सिजनची मागणी 100 पटीने वाढली आहे. दरररोज 16 टन मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन केले जात आहे. आमच्या कायमस्वरूपी हॉस्पिटलला प्राधान्याने ऑक्सिजन देतो. अनेक हॉस्पिटलला मिळत नाही. ऑक्सिजनसाठी रूग्णालयाचे दिवसभर फोन येत आहेत. काही करा पण ऑक्सिजन द्या अशी मागणी 40 हॉस्पिटलकडून केली जात आहे.

परिस्थिती अतिशय गंभीर आहे. प्रशासनाचे नियोजन नाही. काळाबाजर सुरू झाला आहे. लहान लहान दुकान दारांनाही ऑक्सिजन निर्मितीचा परवाना दिला आहे. ते औद्योगिक क्षेत्रात ऑक्सिजन विकत आहेत. कोणाचे कोणाकडे लक्ष नाही. ऑक्सिजन तयार करण्यासाठी लिक्विड मिळत नाही. कच्या मालाचा मोठा तुटवडा आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांकडे कच्या मालाची मागणी केली असता ऍडजस्ट करा म्हणतात पण कच्चा माल दिला जात नाही. विशाखापट्टणम, बिल्लारीवरून मंगळवारी कच्चा माल आणला आहे, असेही त्यांनी सांगितले.