Maharashtra

‘या’ विमानतळाला मिळणार ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचं’ नाव!

By PCB Author

November 25, 2020

लखनऊ,दि.२५(पीसीबी) – अयोध्येत तयार होणाऱ्या विमानतळाला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ, अयोध्या हे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

अयोध्येत विमानतळ निर्माण झाल्यानं प्रवाशांसाठी सोईस्कर ठरेल. हे विमानतळ एनएच २७ आणि एनएच ३३० च्या मध्ये सुल्तानपूर नाकाजवळ तयार होणार आहे. राज्य सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जवळपास ६०० एकर जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाला उपलब्ध करून दिली जाईल.

दरम्यान विमानतळ तसंच इतर आवश्यक सोयी-सुविधांच्या निर्मितीसाठी ५२५ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलीय. देश-परदेशातील पर्यटकांसाठी इथं वेगवेगळ्या सोई विकसित करण्यात येत आहेत