‘या’ मतदारसंघातून शरद पवार लढले असते, तर मी त्यांच्या प्रचाराला गेलो असतो – आंबेडकर

0
647

मुंबई, दि. २२ (पीसीबी) –  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जर नागपुरातून लोकसभा  निवडणूक लढवली असती,  तर मी त्यांच्या प्रचाराला गेलो असतो, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादीने मला पाडायची रणनीती आखली आहे.  आम्हाला ‘बी टीम’म्हणून  हिणवले गेले. पण आम्ही आमची मते मिळवणारच,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

आंबेडकर  एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. एक्झिट पोलवर सेलिब्रेशन करणाऱ्या भाजपने मुल जिवंत की मेलेलं हे बघण्यासाठी वाट पाहायला हवी होती, असा टोला आंबेडकर यांनी भाजपला लगावला. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या  सर्वच्या सर्व ४८ जागा निवडून येऊ  शकतात,  असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रात बिगर भाजप-बिगर काँग्रेस सरकार येईल. विरोधक एकत्र राहतील का, ही त्याची परीक्षा आहे. ते एकत्र राहिले, तर एनडीएला कठीण जाईल.  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस फुटण्याची शक्यता आहे, असेही  आंबेडकरांनी यावेळी  सांगितले.  निवडणुकीनंतर आम्ही सेक्युलर पक्षांबरोबर राहू. केसीआर आणि देवेगौडा हे नेतृत्व करण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.