‘या’ भागात आत्तापर्यंत 15 हजार 725 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

0
184

पुणे,दि.6(पीसीबी) :- पुणे विभागातील 5 लाख 44 हजार 47 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 66 हजार 945 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 173 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 725 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.96 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 65 हजार 519 रुग्णांपैकी 3 लाख 51 हजार 251 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 498 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.10 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 674 रुग्णांपैकी 52 हजार 351 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 548 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 475 रुग्णांपैकी 46 हजार 864 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 876 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 688 रुग्णांपैकी 45 हजार 751 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 202 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 589 रुग्णांपैकी 47 हजार 830 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 49 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 656 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 496, सातारा जिल्ह्यात 41, सोलापूर जिल्ह्यात 67, सांगली जिल्ह्यात 32 तर कोल्हापूर जिल्ह्यात 20 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 860 आहे. पुणे जिल्हयामध्ये 583, सातारा जिल्हयामध्ये 120, सोलापूर जिल्हयामध्ये 119, सांगली जिल्हयामध्ये 18 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 20 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 33 लाख 72 हजार 601 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 66 हजार 945 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 5 जानेवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )