‘या’ फायद्यासाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये गाजर असणे महत्वाचे आहे….

0
191

बाजारात गाजरांची मागणी हिवाळ्यात जास्त वाढते. घराघरांमध्ये अन्नपूर्णा गृहिणी गाजरापासून विविध खमंग पदार्थ तयार करायला घेतात. यात गाजराची कोशिंबीर, लोणचं, हलवा किंवा पराठे हे सगळे पदार्थ तयार करतात.गाजरापासून केलेला कोणताही पदार्थ हा रुचकरच लागतो. गाजर खाण्याचे खरं तर अनेक फायदे आहेत. त्यामुळे खासकरुन हिवाळ्यात बाजारामध्ये लाल-केशरी गाजरं दिसू लागल्यावर त्याचा आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे.

गाजर खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे आहेत…

1.गाजराच्या नियमित सेवनाने हदयासंबंधित आजार कमी होतात.

2.गाजरामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

3.गाजराचा ज्यूस किंवा त्याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

4.गाजर सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते.

5. शरीरात उब निर्माण करण्यास गाजर उपयुक्त ठरते.

6. गाजराच्या रसामुळे अशक्तपणा दूर होतो.

7. गाजरामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.